हा तोच का? नाही, नाही..हा तो नाही!
पण हा तोच आहे...अं हं..नाही!
चेहऱ्यावरून तरी तोच वाटतोय...पण मग अचानक आज हा बदल का जाणवतोय?
आणि बदल जाणवतोय तर मग फक्त मलाच? का त्याला पण? का सगळ्यांनाच? आणि मग जर बदल
सगळ्यांनाच जाणवत असेल, तर आज काय बदलल नक्की? 'तो' का त्याच्याकडे बघायची
दृष्टी?
विचार...कोडी..न उलगडणारी..
माणूस तोच असतो..अगदी रोज जसा दिसतो तसाच..फार तर फार उंची, जाडी आणि
डोक्यावरील काळ्या केसांची किंबहुना केसांचीच संख्या बदलत असते फक्त...आणि आपण
ज्याला सुसंकृत भाषेत 'नीटनेटके कपडे' म्हणतो..तस काहीतरी..
तुम्ही माणूस मनातून ओळखलात का हो कधी? त्याआधी स्वत:च मन तरी कधी?
आपल्या मनासारखीच बाकीची मने इथे-तिथे आपल्याला सभोवती फिरताना
दिसतात...
मुळात माणसाच्या मनाच विवस्त्र रूप खूप सालस आणि निर्मळ आहे..आपणच त्याला राग,
मत्सर, अहंकार आणि तणाव ह्यांच्या बुर्ख्यांनी पार गुंडाळून टाकलय...इतक की शेवटी आपलच मन आपल्याला ओळखता येत नाही...
आज-काल अशी बुरखे घालूनच फिरणारी माणस खूप दिसतात..त्याचा फार त्रास
होतो...
--अमोल नेरलेकर
No comments:
Post a Comment