कोण आज नव्यानी तुझ्या भुलला दारी ?
आज कोणता नवीन खेळ रंगला दारी ?
शब्दांनी खरे तर पूर्वी अंगण भरले होते,
का असा मौनाचा वसंत फुलवला दारी?
मी येण्याची तेव्हा चाहूल तुला गे आली,
सांज कंदीलाचा का दीप विझवला दारी?
आता असे करूया अन आता तसे करूया
संवाद स्वप्नाचा तेव्हा, किती चालला दारी!
वेशीवरी आली माझ्या येण्याची वार्ता,
न्हाऊन स्वत:ला तू सण सजवला दारी..!
समोर येता माझ्या, फुलल्या कळ्या त्या अनंत,
अधीर झालीस तू ही, 'तो' क्षण थांबला दारी…
-- अमोल नेरलेकर
आज कोणता नवीन खेळ रंगला दारी ?
शब्दांनी खरे तर पूर्वी अंगण भरले होते,
का असा मौनाचा वसंत फुलवला दारी?
मी येण्याची तेव्हा चाहूल तुला गे आली,
सांज कंदीलाचा का दीप विझवला दारी?
आता असे करूया अन आता तसे करूया
संवाद स्वप्नाचा तेव्हा, किती चालला दारी!
वेशीवरी आली माझ्या येण्याची वार्ता,
न्हाऊन स्वत:ला तू सण सजवला दारी..!
समोर येता माझ्या, फुलल्या कळ्या त्या अनंत,
अधीर झालीस तू ही, 'तो' क्षण थांबला दारी…
-- अमोल नेरलेकर
No comments:
Post a Comment