काल बोलता बोलता सहज विषय निघाला आणि ती मला म्हणाली, 'तुझ्या आयुष्यात एवढ्या
व्यक्ती आहेत, एवढी नाती आहेत मग त्यात माझ अस वेगळेपण काय?'
क्षणभर मी काय बोलायच ह्याचा विचार करत होतो कारण सगळ्याच भावना व्यक्त करता येतातच अस नाही आणि व्यक्त करता आल्या तरी शब्दांत मांडता येतीलच असही नाही.
मी तिला म्हणालो,
'माणसाच आयुष्य अनेक माणसांनी आणि नात्यांनी फुलल आहे, बहरलं आहे आणि ही नाती किव्वा माणस पण बघ ना कशी संगीतातल्या स्वरांसारखी! षड्जापासून निषादापर्यंत अनेक रूपांतून सजलेली आणि प्रत्येकजण स्वतःची अशी स्वतंत्र ओळख पाळणारा. कोणाचा तरी भाऊ, मुलगा, मित्र, सहकारी, प्रियकर, नवरा, बाप आणि अगदी काका-मामापर्यंतसुद्धा ! ह्यातलं प्रत्येक नात एखाद्या स्वरासारख आहे आणि त्यातपण परत अनेक प्रकार. 'मित्र', 'सहकारी', 'भाऊ' आणि 'काका'-'मामा' म्हणजे ऋषभ, गांधार, धैवत आणि निषादासारखे; शुध्द पण आणि कोमल पण…म्हणजे एकाच स्वराची - एकाच नात्याची दोन रूप ! 'बाप' हे मध्यमात बसणार; कधी सामान्य तर कधी त्या नात्याची तीव्र भावना घेऊन जगणार…आणि 'मुलगा' म्हणजे पंचमासारख - संपूर्ण सप्तकाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर अविरत पण तितक्याच सहजतेने आणि संयमाने पाळणार! अशा अनेक स्वरांच्या मिश्रणानेच तर माणसाच्या आयुष्यात अनेक 'राग' भरले आहेत आणि असे अनेक 'राग' गाउन जगण हीच तर खरी मजा आहे…!'
'मग ह्या सगळ्यात मी कुठे आले?' तिने विचारलं.
'तुझ्याशी असलेल नात षड्जासारख आहे, अटळ आणि प्रत्येक सप्तकाची सुरेल सुरुवात करणार. कोणताही 'राग' असो, त्यात कोणतेही 'सूर' असोत, गायकाला षड्जाचाच आधार लागतो आणि षड्ज कळल्याशिवाय कुठलच संगीत उमजू शकत नाही! 'भूप' असो वा 'देस' आणि 'मारवा' असो वा 'भैरवी' कोणत्याही रागात आणि त्याच्या प्रहरात षड्जाला तितकच अढळ आणि मानाच स्थान आहे. 'षड्जा'शिवाय संगीत अपूर्ण आहे...'
क्षणभर तिला रागांची नावे कळली नाहीत पण ह्या सगळ्या चर्चेतून एक खूप छान मैफिल सजल्याचे समाधान मात्र मला मिळाले…!
-- अमोल नेरलेकर । १४.०६.२०१५

No comments:
Post a Comment