कोरोना, कोरोना काय
रे मोठ्ठा प्रॉब्लेम
केलास,
माझ्या पाणीपुरीवाचून
मला विरह किती
दिलास..
एक नाही,
पाच नाही, आता
झाले तब्बल वीस,
आंबट-गोड
पाण्यावाचून घसा कोरडा
किती दिस..
छोट्या परातीमधला
तो गरम-गरम रगडा,
बारीक चिरलेल्या
कांद्यावरती कोथिंबिरीचा सडा..
कोणा तिखट,
कोणा गोड, कोणा
मिडीयम हवे जरी,
एकाच पदार्थामध्ये
बघा 'व्हेरिएशन' किती..
पाणीपुरीच्या खेळामध्ये पुरीच
स्थान खरं,
चविष्ट पाण्यासोबत
थोडी शेव असण बरं..
गोलगटटू पुरीला मग
हळूच मधोमध फोडणं
,
सगळ्यांना सोबत कवेत
घेऊन छान तिचं
सजण..
भैय्याच मात्र प्रत्येक
पुरीवर तितकंच सारखं
प्रेम,
एकेकाची चव जपता कधी चुकत
नाही नेम..
कोण म्हणत
'सुख' कधी मोजता
येत नाही?
दोन बोटांत
पुरी येता, 'सुख'
वेगळं का हो काही?
सहा पुरींचा
खेळ संपला की
जरा वाईट वाटतं,
तेवढं जरा
दूर करणं 'मसालापुरीचं'
काम असत..
स्वप्नी आता सदा दिसे 'ती',
काय लिहिले रे
भाळी?
जाऊ दे
एक मुखात अन
लागो ब्रह्मानंदी टाळी..
!!
-- अमोल नेरलेकर,
५ एप्रिल २०