आज बऱ्याच दिवसांनी उघडला कोपऱ्यातला कप्पा..
कित्येक वर्षे ना तहान, ना भूक, त्यापलीकडेही गेलेला तो,एका स्थितप्रद्न्य साधूसारखा एकटाच बसून होता..
आज बऱ्याच दिवसांनी उघडला कोपऱ्यातला कप्पा..
त्यात एक सापडला फोटोचा अल्बम जुना...
कोडॅकच्या कॅमेऱ्यामधून काढलेले मोजकेच ३५ फोटो,
आणि रीळ उलटे फिरण्याआधी येतोय का आणखीन 'फोटो'?
फोटोतल्या आठवणी लगेच ताज्या झाल्या,
कोणाकोणाचे अस्तित्व क्षणिक भासवून गेल्या...
'हा बघ, मी असा होतो तेव्हा',
आणि आता असा झालो कळलेच नाही केव्हा..
फोटो बघून आली आठवण 'आत्त्ता हवेसे वाटणाऱ्यान्ची',
फोटो बघून झाली जाणीव 'तेव्हा तसे असणाऱ्यान्ची'...
सारं सारं कॅमेऱ्याने अचूक टिपलं होतं,
मनात जे जे वाटलेलं ते तसंच छापलं होतं...
आज बऱ्याच दिवसांनी उघडला कोपऱ्यातला कप्पा..
आणि त्या ३५ फोटोंमध्येही कसा 'अनलिमिटेड पिक्चर' पाहून झाला...
सध्याच्या फोनच्या 'अनलिमिटेड स्टोरेज'मध्ये,
तसा एकही पिक्चर बसला नसता...
वाटलं आत्ताच्या ५०मेगापिक्सेल कॅमेऱ्यापेक्षाही,
तेव्हाचा कॅमेरा किती बरा होता..
आणि आत्ताच्या 'कँडिड' फोटोपेक्षाही,
चेहरा 'तेव्हाचा' खरा होता...
आज बर्याच दिवसांनी उघडला कोपऱ्यातला कप्पा..
आणि खरंतर मनावरचीच अनेक जळमटं झाली दूर,
मनातल्या गंगा-जमुनेला आले आठवणींचे पूर...
चित्रांवरून हात फिरवला की स्पर्श मायेचा अजून येतो,
मूक मनाच्या गाभाऱ्यातही खूप काही बोलून जातो...
अल्बम पाहून संपला तरी, मनात चित्र फिरत होती...
सारं फोटोत दिसलं तरी, राहून गेलेलं शोधतं होती...
अल्बम फोटोंचा बंद करता, खंत दाटली उरी,
'माणसं कितीही बदलली तरी, चित्र अजूनही तशीच होती'...
-- अमोल नेरलेकर । २४ सप्टेंबर २०२२